भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे ठार; गोजोरा गावाजवळील घटना

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावाजवळील रोडवर दुचाकीने जात असलेल्या दोघांना भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात पिकअप वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामसिंह गमरिया भिलाला वय-४७ आणि मोटला छितरीया भिलाला वय ४० दोन्ही रा. उमरिया ता.भगवानपुरा जि. खरगोन मध्य प्रदेश असे मयत झालेल्या दोघांची नावे आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील गोजोरा गावाजवळील रस्त्यावरून रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला हे दोघे दुचाकी क्रमांक एमपी १० झेडपी ४०१ या दुचाकीने येत होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकप वाहन क्रमांक (एमएच १५ डीके १५६९) दोघांना उडविले. या घटनेत दुचाकीवरील रामसिंह भिलाला आणि मोटला भिलाला या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मयत रामसिंह भिलाला यांचा भाऊ शांताराम गमरिया भिलाला याने भुसावळ तालुका पोलिसात पिकअप वाहनावरील चालका विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बुधवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता पिकअप वाहनवरील चालक सुनील मीना जोहरे रा. पिंपळगाव ता. भुसावळ याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे या करीत आहे.

Protected Content