पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बेलदार मोहल्ला येथील माहेर आणि सासर असलेल्या विवाहितेला माहेराहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी करत तिला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील बेलदार मोहल्ला येथे राहणाऱ्या इरफाना कलामोद्दीन शेख वय-२७, यांचा विवाह याच परिसरातील कलामोद्दीन रियाजोद्दीन शेख यांच्याशी रीतीरीवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. त्याच्यानंतर पती कलामोद्दीन शेख याने विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेराहून ५ लाख रुपये आणावी, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हालाखीचे असल्याकारणामुळे त्यांनी ५ लाख रुपये दिले नाही. याचा राग आल्याने पती कलामोद्दीन शेख याने विवाहिचा शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सासू, सासरे, दीर आणि नणंद यांनी देखील पैशांसाठी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक त्रास देवून दमदाटी केली. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी त्यांनी बुधवारी १० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती कलामोद्दीन रियाजोद्दीन, सासरे रियाजोद्दीन रफीयोद्दीन शेख, सासू रईयाबी रियाजोद्दीन शेख, दिर समशेर रियाजोद्दीन आणि आनंत अफ्रिनबी रियाजोद्दीन शेख सर्व रा. बेलदार मोहल्ला धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जनार्दन पाटील हे करीत आहे.

Protected Content