आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मशालला मतदान करायचे होते, मात्र बळजबरीने भाजपला मतदान करायला लावल्याचा व्हिडीओ तयार करुन तो सोशल मीडियवर व्हायरल करुन मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेसह आचारसंहितेचा भंग केल्याची घटना जळगाव तालुक्यातील फुफनगरी येथे सोमवारी ६ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी दुपारी ३ वाता गुलाब आनंदा कांबळे, आदित्य गुलाब कांबळे ( दोघ रा. फुफनगरी, ता. जळगाव) यांच्यासह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील कानळदा येथील मंडळअधिकारी छाया मनोज कोळी यांना सोमवारी ६ मे रोजी एक व्हीडीओ क्लिप आली. त्यांनी ती बघितली असता, आनंदा सता सपकाळे रा. फुफनगरी ता. जळगाव यांना अनोळखी इसम हा तुम्हाला पथकातील कर्मचाऱ्यांनी भाजपला बळजबरी मतदान करायला लावले आहे. तुम्हाला मशालला मतदान करायचे होते ना अशी प्रकारची विविध वक्तव्ये केली. तसेच मतदारांसोबत ही वक्तव्ये करुन मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केला. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी विशिष्ट पक्षास मतदान करुन घेतल्याबाबत सर्वांसमोर अफवा पसरवून गैरसमज देखील निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे ही खोटी क्लिप प्रसारमाध्यमांना देखील प्रसारीत केली आहे.

मंडळधिकाऱ्यांसोबत असलेल्या पथकातील सदस्यांना निवडणुकीच्या कामात अटकाव करु न त्यांना दमदाटी करणाऱ्या गुलाब आनंदा कांबळे व आदित्य गुलाब कांबळे दोघ रा. फुफनगरी यांच्याविरुद्ध पुरावे नसतांना खोटी व्हिडीओ व्हायरल करत आचारसंहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहेत.

 

Protected Content