दारूच्या नशेत येऊन महिलेचा विनयभंग एकावर गुन्हा दाखल

भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या एका 54 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी 25 मे रोजी रात्री 9 वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी 28 मे रोजी रात्री 11 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील आनंद नगर परिसरातील एका भागात 54 वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान गोलू सावकारे (पूर्ण नाव माहित नाही) रा. भुसावळ याने शनिवारी 25 मे रोजी रात्री 9 वाजता दारूच्या नशेत येऊन महिलेसोबत अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर मंगळवारी 28 मे रोजी रात्री 11 वाजता महिलेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गोलू सावकारे रा. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content