रामटेक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष तयारी करत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत झाली आहे. महाराष्ट्रात विदर्भातील काही मतदारसंघात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात विदर्भात रामटेक मतदारसंघाचा समावेश आहे.
काँग्रेसला या मतदारसंघातून जोरदार झटका बसला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे आहे. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्जही बाद होऊ शकतो. काही दिवसांपुर्वी ऱश्मी बर्वे यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रावर विरोधांकडून आक्षेप घेण्यात आला होता. हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप विरोधकांनी केला. बर्वे यांच्याविरोधात सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली होती. त्यानंतर रश्मी बर्वेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून तात्पुरता दिलासाही मिळाला होता. पण तरीही कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर होती. यामुळे लोकसभा निवडणूका ऐन तोडांवर असताना काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.