भुसावळ येथे वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा उत्साहात

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात आज वंचित बहुजन महिला आघाडीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी अरूंधती यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अरुधंती शिरसाठ यांनी पक्षीय राजकारण व त्यात महिलांचे स्थान यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीची भुमिका व येत्या काळात असलेले राजकिय प्रश्न व त्यात वंचित व तळागाळातल्या महिलासाठी त्यांचे न्यायिक हक्क व अधिकार याची जाणीव करुन देणे, ५०% राजकीय  सहभागीता करुन देणे, यासाठी सक्रिय करणे, यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी आहे, असे मनोगत व्यक्त केले. 

वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने, महिलांचा राजकारणातील टक्का वाढावा व महिलांनी सुद्धा निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले  पाहिजे म्हणून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे होते तर कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्षा डॉ.निशा शेंडे, प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ, शामिभा पाटील राज्य सदस्य आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पवार यांनी केले व आभार प्रदर्शन बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष यांनी मानले. जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कोळी तालुकाध्यक्ष, अरूण तायडे जिल्हा संघटक, अरूण नरवाडे जिल्हा कोषाध्यक्ष, संगिताताई भामरे, वंदना ताई सोनवणे,नितीन रणित जिल्हा उपाध्यक्ष, देवदत्त मकासरे गणेश इंगळे तालुका सचिव, सचिन बाऱ्हे जिल्हा प्रमुख, सचिन सुरवाडे जामनेर तालुकाध्यक्ष, विद्यासागर खरात, रुपेश साळुंके, बबन कांबळे, रूपेश कुऱ्हाळे, प्रमिलाताई बोदडे, अनिता ताई मोरे ,रवि कोळी, दिलीप भालेराव, कांतीलाल गाढे, अक्षय निराले व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content