दोन दुचाकींच्या अपघातात वृध्द गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चुकीच्या मार्गाने घुसलेल्या दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकी जोरदार धडक दिल्याने वृध्द गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून गोपाल घनश्याम पाटील वय ७२ रा. एकलग्न ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक (एमएच १९ ए ७३२५) ने एकलग्न कडून पाळधी येथे येत असतांना समोरून प्रमोद शंकर चौधरी रा. पिंप्री ता. धरणगाव हा त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीबी ७४१९) ने चुकीच्या मार्गाने येवून गोपाल पाटील यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात गोपाल पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार प्रमोद शंकर पाटील रा. पिंप्री ता. धरणगाव याच्या विरोधात धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहे.

Protected Content