ईद-ए-मिलाद निमित्त महारक्तदान शिबीर ; मुस्लीम महिलांचाही पुढाकार

WhatsApp Image 2019 11 10 at 8.32.03 PM

जळगाव, प्रतिनिधी | अक्सा व रजा नगर कॉलनी येथील मॉरल मल्टीपर्पज फाउंडेशनतर्फे ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान करून उत्सव साजरा करण्यात आला. या महारक्तदान शिबिरास महिलांनी देखील प्रतिसाद दिला.

जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, ताहेर शेख यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन तरुणांना मार्गदर्शन केले.या रक्तदान शिबिरात रेड प्लस ब्लड बैंकने रक्ताच्या १२५ बॉटल जमा केलेल्या आहे.याकामात जमाते इस्लामी हिंद समाजसेवा विभाग यांचे सुद्धा सहकार्य लाभले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यात मेहरुण परिसरातील मुस्लिम डॉक्टरांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. डॉक्टर सोबतच डॉ. फारुक शेख यांच्या परिवारातील महिला सौ समीना तोफिक , हुसेना बी, डॉ. सायका फारुक शेख, कुमारी सरोष फारुक शेख, सौ नफीसा साजिद शेख यांनी सुद्धा रक्तदान केले.रक्तदान शिबिरात मल्टीपर्पज फाउंडेशनचे अफजल खान अयुब खान ,डॉ. फारुक शेख, विकार सय्यद, अहमद पटेल, डॉ. मोइज देशपांडे, डॉ. मीनाज पटेल, डॉ. रईस कासार, डॉ. आसिम खान, डॉ. फ़िरोज़ शेख तर जमात जमात-ए-इस्लामीतर्फे मुश्ताक सर, रिजवान खाटीक, रफिक खान,तौसीफ पठाण, साजिद अख्तर आदींनी रक्तदान करून परिश्रम सुद्धा घेतले.
ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम परिसरात मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या रक्तदानाबाबत सर्वांनी त्यांचे कौतुक व अभिनंदन केलेले आहे.

Protected Content