यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोळन्हावी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने जळगाव येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल राजेन्द्र पाटील (वय-२६) रा. सावखेडा सिम, ह.मु. जळगाव आणि ईस्माइल हबीब तडवी (वय-३०) रा. सावखेडा सीम हे दोघे दुचाकी (एमएच १९ डीबी २७४६) ने शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास किमगाव येथे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत अमोल पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर इस्माईल हबीब तडवी हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या हबीबला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात करण्यात आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.