नंदूरबार रेल्वेच्या आयओडब्लु विभागातून कमला पाटील सेवानिवृत्त

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील उंटावद येथील कमलाबाई पाटील यांची नंदुरबार रेल्वेस्टेशनच्या आयओडब्लू या विभागातील प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्ती करण्यात आली. तथापि, त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला आहे.   

याआधी त्यांचे पती जनार्दन पाटील यांनी ५ वर्षे १० महीने रेल्वेत बुकींग क्लार्क म्हणून आपली सेवा दिली होती. मात्र त्यांचे आकस्मात निधन झाल्याने त्यांच्या जागी कमलबाई पाटील यांना रेल्वेत सेवा करण्याची संधी मिळाली होती. कमलबाई पाटील या मुळ शिंदखेडा जिल्हा नंदुरबार  येथील रहिवाशी आहेत पतीच्या निधनानंतर कमलाबाई पाटील यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या बळावर सक्षमरित्या कुटुंबाचा सांभाळ करीत कुटुंबाच्या कार्यासाठी त्यांनी स्वताहास वाहुन घेतले. सेवानिवृत्तीच्या कार्येक्रमा प्रसंगी आयओडब्लू विभागाचे आधीकारी व कर्मचारी यांनी कमलबाई पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना निरोप दिला. दरम्यान, पत्रकार महेश पाटील यांच्या त्या सासूबाई आहेत.

यावेळी आयओडब्ल्यु विभागाचे अधीकारी सुनिल पगारे, शिरसाठ, ओम, योगेश वाणी, कपील, सुरेश हसरत, महेश, सुनिल, शरद चौधरी, बालमुकुंद पाटील, केतन पाटील, विकास पाटील, बिपीन पाटील, गणेश पाटील, बबलू पाटील, सुभाष सुर्यवंशी, नारायण सुर्यवंशी आदीसह मान्यंवर या कार्यक्रमास उपस्थीत होते.

Protected Content