Home Cities मुक्ताईनगर संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मोठे वडाचे झाड कोसळले

संत गजानन महाराज मंदिर परिसरातील मोठे वडाचे झाड कोसळले


मुक्ताईनगर/शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेगाव येथे मंदिर परिसरातील एक शेकडो वर्षाआधीचे वडाचे झाड आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे कोसळले असून मोठे जीवितहानी टळली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या मंदिरात रोज लाखो भावी दर्शन घेत असतात.
अशातच १६ मे रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पावसामुळे मंदिर परिसरातील एक मोठे वडाचे झाड जमीन दोस्त झालेले आहे. याबाबत माहिती अशी की शेकडो वर्षीय वडाच्या झाडामुळे कोणतेही जीवितहानी झालेली नाही संत गजानन महाराजांची कृपा सर्व भक्तांवर असतेच असे नागरिकांचे म्हणणे आहे.


Protected Content

Play sound