Home Cities रावेर सावदा बस स्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात

सावदा बस स्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा येथील बस स्थानकाला संपूर्ण अतिक्रमणाने विळख्यात वेढले असून प्रवाशांना बस स्थानक मध्ये येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो आहे. या त्रासाला कंटाळून काही वेळेस प्रवासी मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत असतात, तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित व स्थानक परिसरातील अतिक्रमण त्वरित काढावे.
बस जाण्याचा व प्रवासी जाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी प्रवासी नागरिकांनी केली आहे. काही वेळेस या अतिक्रमणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या बसला व वाहनांना सुद्धा या परिसरात त्रास सहन करावा लागतो. तरी या परिसरातील असलेले अतिक्रमण प्रशासनाने त्वरित आठवावे व प्रवासी व बॉस वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोकळा श्वास मिळवून द्यावा असे बस चालक वाहन चालक व प्रवासी नागरिक करीत आहे


Protected Content

Play sound