अ.भा. वीर गुर्जर महासभेत महाराष्ट्रातून दोन जणांची राष्ट्रीय पातळीवर निवड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेने महाराष्ट्रातील दोन जणांची राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. प्रगतिशील शेतकरी विजयसिंह गुर्जर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, तर पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील गुर्जर यांची राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गुर्जर समाजासाठी समर्पित कार्याची दखल
गुर्जर समाजाच्या एकत्रीकरणासाठी, शैक्षणिक-आर्थिक उन्नतीसाठी, आणि विषमतेच्या निर्मूलनासाठी या महासभेने भरीव योगदान दिले आहे. कोरोना काळात गुर्जर बांधवांसाठी करण्यात आलेल्या मदतीची दखल घेत, महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या योगदानाला मान्यता म्हणून ही महत्त्वाची निवड करण्यात आली आहे.

महासभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन
या नियुक्तींमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील गुर्जर समाजात आनंदाचे वातावरण आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, उपाध्यक्ष अशोक जाधव, सचिव डॉ. राध्येशाम चौधरी, महाराष्ट्र प्रभारी रवींद्र रावल, तसेच राष्ट्रीय संरक्षक नरेंद्र गुर्जर यांनी नवनियुक्त झालेल्या विजयसिंह गुर्जर आणि वसंतराव पाटील गुर्जर यांचे अभिनंदन केले आहे. अ.भा.वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग गुर्जर यांनी निवडीची अधिकृत घोषणा पत्राद्वारे केली.

संघटनात्मक बांधणीसाठी नवी कार्यकारिणी लवकरच तयार होणार
महासभेचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील संघटनेची जबाबदारी अधिक दृढ करण्यासाठी लवकरच प्रदेश आणि जिल्हा पातळीवर नवी कार्यकारिणी निवडली जाणार आहे. दोघांच्या नियुक्तीमुळे या नियुक्तींमुळे गुर्जर समाजाच्या संघटनात्मक विकासाला आणि सामाजिक-आर्थिक उन्नतीला गती मिळणार आहे. विजयसिंह गुर्जर आणि वसंतराव पाटील यांच्या अनुभवाचा फायदा महासभेला राष्ट्रीय पातळीवर होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Protected Content