Home Cities अमळनेर जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या


 

जळगाव : प्रतिनिधी ।  प्रशासकीय व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुशंगाने  जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी आज मंगळवारी दुपारी या  बदल्यांचे आदेश काढले आहे.

 

यात मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे सुरेश शिंदे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. तर नव्याने हजर झालेले रामकृष्ण पवारी यांची मुक्ताईनगर येथे, धरणगावचे जयपाल हिरे यांची अमळनेर पोलिस ठाण्यात, नियंत्रण कक्षातील अंबादास मोरे यांची धरणगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली. पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हे आदेश काढले आहेत.


Protected Content

Play sound