वॉटर कप स्पर्धेत अनोरे राज्यात तृतीय

अमळनेर प्रतिनिधी । पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाने राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.

वॉटर कप स्पर्धेचे पारितोषीक वितरण पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी करण्यात आले. यंदा प्रथम पारितोषिक सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी या गावाने पटकावले. द्वितीय पिंपरी जलसेन (ता. पारनेर, जि.सातारा) व शिंदी खु.(ता. मान) यांनी पटकावला. तर तृतीय पारितोषिक अमळनेर तालुक्यातील अनोरे, बीडमधील देवर्‍याची वाडी आणि वाशीम जिल्ह्यातील बोरवा बुद्रुक गावांना मिळाले. अनोरे गावाने लोकसहभागातून जलक्रांतीचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले असून वॉटर कपमधील स्पर्धेतला यश हे यावरील कौतुकाची मोहर ठरली आहे.

Protected Content