टिफीन बैठकीत आ.अमोल जावळेंनी ग्रामस्थांशी साधला जिव्हाळ्याचा संवाद

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली रावेर मतदारसंघात संवाद दौरा सुरू असून, या दौऱ्याच्या निमित्ताने दोधा गावात टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार जावळे यांनी गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुणांसोबत मोकळा संवाद साधला. गावकऱ्यांनी आपापल्या समस्या आणि अपेक्षा थेट आमदारांपुढे मांडल्या, ज्यावर त्यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या संवादाच्या माध्यमातून आमदार आणि ग्रामस्थांमधील बंध अधिक दृढ झाला. गावकऱ्यांनी विकासकामांसाठी आपल्या सूचनांचा तसेच गरजांचा उल्लेख केला, ज्याला आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे गावकऱ्यांचा सहभाग आणि समाधान दोन्ही वाढले.

टिफिन बैठक ही केवळ समस्या मांडण्यासाठीच नव्हे, तर गावाच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरली. आमदार जावळे यांनी गावातील पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्याचे आश्वासन देत ग्रामविकासाला चालना देण्याचा निर्धार व्यक्त केला. अमोल जावळे यांच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांच्या लोकाभिमुख आणि संवादक्षम नेतृत्वाचा प्रत्यय या वेळी ग्रामस्थांना आला. या बैठकीमुळे गावकऱ्यांमध्ये विश्वास आणि आपल्या समस्यांवर तोडगा मिळण्याचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

या प्रसंगी सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, राजन लासूरकर, सुनील पाटील, वासुदेव नरवाडे, चेतन पाटील, जितेंद्र चौधरी, हर्षल पाटील, जनार्धन पाटील, निवास पाटील, नंदू पाटील, राहुल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content