Home Cities भडगाव राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मंजीरी सुपर अबॅकस अकॅडमीचे उज्वल यश

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मंजीरी सुपर अबॅकस अकॅडमीचे उज्वल यश

0
110

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या अबॅकस नॅराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मंजिरी सुपर अबॅकस अकॅडमीने आपली चमकदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत विविध श्रेणींमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.

प्रज्ञा अमोल निकम हिने पहिला क्रमांक पटकावला, तर मनीष गुलाब चव्हाणने तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान मिळवले. हेतल चेतन सोनार चौथ्या स्थानावर राहिली, तर अपूर्वा अरविंदसिंग परदेशीला “प्राउड स्टुडंट” म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय इतर विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी देऊन त्यांच्या यशाची दखल घेण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा भव्यदिव्य स्वरूपात पार पडला, ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, प्रख्यात उद्योजक सुनील देसरडा, आणि मनीष महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

मंजिरी सुपर अबॅकस अकॅडमीच्या केंद्र संचालक मंगेश जोशी आणि मृदुला मंगेश जोशी यांचेही कौतुक करण्यात आले. त्यांना “उत्कृष्ट शिक्षक” आणि “बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले. या यशामुळे संस्थेचा गौरव झाला असून, विद्यार्थ्यांनी भडगावचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.


Protected Content

Play sound