खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खामगाव प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोरआप्पा भोसले यांची निवड झाली असून, स्वाभिमानी प्रगती पॅनलने ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या निकालानंतर टॉवर चौकात फटाक्यांची आतषबाजी व जल्लोषमय वातावरण दिसून आले.

खामगाव प्रेस क्लबची निवडणूक २३ जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे पारदर्शकपणे पार पडली. दोन पॅनलमध्ये झालेल्या या निवडणुकीत स्वाभिमानी प्रगती पॅनल आणि परिवर्तन पॅनलमध्ये चुरस होती. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या मतदान प्रक्रियेत ७२ पैकी ७० सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अंतिम निकालानुसार, किशोरआप्पा भोसले हे अध्यक्षपदी ४४ मतांच्या बहुमताने विजयी झाले. इतर पदांवरही स्वाभिमानी प्रगती पॅनलचे उमेदवार विजयी झाले, ज्यामध्ये नितेश मानकर आणि किरण मोरे (उपाध्यक्ष), अनिल गवई (सचिव), मोहन हिवाळे (सहसचिव), आकाश पाटील (कोषाध्यक्ष), आणि मुबारक खान (सह कोषाध्यक्ष) यांचा समावेश आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर टॉवर चौकात फटाके फोडून, डिजेच्या तालावर थिरकत, आणि एकमेकांना अभिनंदन करून पत्रकार बांधवांनी विजयाचा आनंद साजरा केला. ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.