नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी एल्गार पुकारला आहे. परंतु, दुसरीकडे आरक्षणासाठी अनेक मराठा आंदोलक टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी होत असलेल्या आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याच नाव घेत नाही. आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. नांदेडमधील एका 25 वर्षीय तरुणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी विष प्रशान करून आत्महत्या केली आहे.
नांदेडपासून जवळच असलेल्या मरळक येथली घटना आहे. दाजीबा रामदास शिंदे असं मृत तरुणाचं नाव आहे. 11 नोव्हेंबरला विष प्रशान केल्यानंतर दाजीबा कदमला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दाजीबा कदम यांच्याजवळ एक सुसाईड नोटही आढळून आली. सुसाईड नोटमध्ये समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे, असा मजकूर सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आला होता. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली असून दाजीबाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
दाजीबा कदम हा मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता, दाजीबा कदम यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. आरक्षण नसल्यामुळे दाजीबा काही करू शकला नाही, तसेच त्याच्या वडिलांनी त्यांची दीड एकर शेती विकली होती, असं मृत दाजीबाच्या भावानं सांगितलं, शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करू, असं तहसीलदार विजय आवधान यांनी सांगितलं. तसेच, मराठा आरक्षणावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी विठ्ठल पावडे यांनी केली आहे.