चाळीसगाव प्रतिनिधी– चाळीसगाव शहर पो स्टेशन हद्दीतील गोपाळपूरा भागात चोरटी गांजाची विक्री करणारा व गांजा बाळगणाऱ्या मांगीलाल मुरलीधर गुजर याला आज अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे कि मांगीलाल मुरलीधर गुजर (वय 52 वर्षे, राहणार- गोपालपुरा, चाळीसगाव) हा गांजा विकत असल्याची चाळीसगाव शहर पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती. या अनुसार अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे व उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, पोहेका गणेश पाटील, पोना भगवान उमाळे, पंकज पाटील, सुभाष घोडेस्वार, संदीप पाटील, पोशीसह दीपक पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, विजय पाटील, संदीप पाटील व मपोशी सबा शेख यांचेघरी तसेच सागर ढवळे व दोन पंच यांचे उपस्थितीत सदर आरोपीच्या घरी आज रोजी संध्याकाळी 6.00 वाजेच्या सुमारास छापा टाकला.
यात आरोपीच्या राहत्या घरात रक्कम रुपये 6840 रुपयांचा 1 किलो 368 ग्रॅम गांजा व रोख रक्कम रुपये 21300 असा एकूण 28140 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीविरुद्ध पोशी दीपक पाटील यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला NDPS कायद्यानुसार गुन्हा क्र 292/२०२० एन डी पी एस कायदा 1985 चे कलम 8 क सह 20 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.