VIDEO : खाकीमुळे महिलेला जीवनदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलिसांचे ब्रीदवाक्य …याचा नुकताच प्रत्यय आलाय. जळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वेत चढताना महिलेचा पाय निसटला. प्रसंगावधान राखत  या महिलेला पोलिस कर्मचाऱ्याने जीवदान दिले आहे.

 

पोलीस हवालदार दिनेश विश्वनाथ बडगुजर असे या महिलेचा जीव वाचवणार्‍या जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

 

जळगाव रेल्वेस्थानकावर १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये चढताना सुनिता पांडूरंग बेडीस (वय-५०) रा.चाळीसगाव ही महिलेचा पाय घसरला. याचवेळी महिला रेल्वे आणि प्लॅटफार्मच्यामध्ये पडत असताना दिनेश बडगुजर  या पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तिचा जीव वाचवला. दिनेश बडगुजर हे जळगाव जिल्हा पोलिस दलात जिल्हा विशेष शाखेतील हवालदार म्हणुन कार्यरत आहे. या कार्याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी सत्कार केला.

Protected Content