मुंबई , वृत्तसंस्था, । अभिनेता संजय दत्त याने सोशल मीडियात आपण कॅन्सरमधून बाहेर पडल्याची खुशखबर जाहीर केली. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं . संजय दत्त ६१ वर्षांचा असून मुंबई व युएस मध्ये त्याच्या आजारावर उपचार केले गेले.
संजय दत्त कॅन्सरमुक्त होऊन कोकिलाबेन रुग्णालयातून घरी परतला आहे. कठीण परिस्थितीत संजय दत्तने कॅन्सरवर मात करणं बॉलीवूडसाठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. आपण ऋषी कपूर आणि इरफान खान यांसारखे हरहुन्नरी कलाकार कॅन्सरमुळे गमावलेत. पण संजय दत्तने या आजाराला हरवलं.
संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सरची ४थी स्टेज सुरु होती. संजय दत्त उपचारांसाठी अमेरिकेला गेला. कारण ट्यूमरशी लढा देण्यासाठी तातडीने उपचार घेणं गरजेचं होतं.
वेळेत उपचार करुन या गंभीर आजारावर मात नक्कीच करता येऊ शकते. फुफ्फुसाचा कॅन्सर हा तंबाखूचं सेवन करणा-या आणि सिगारेट ओढणा-या लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
त्याची लक्षणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर आधारित असतात. काही लोकांना जीव घाबराघुबरा होणे, छातीत वेदना, श्वास घेण्यास अडथळा, रक्त पडणारा खोकला, अपचन, न्युमोनिया अशी लक्षणे दिसून येऊ शकतात. पुढील टप्प्यात हा कॅन्सर हाडे व इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये पसरतो. या काळात स्ट्रोक, हार्मोन्सचं असंतुलन आणि वजन कमी होणे अशा समस्या दिसून येतात.