Home Agri Trends रोपवाटिका योजनेच्या अर्जासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

रोपवाटिका योजनेच्या अर्जासाठी २ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

0
43


जळगाव प्रतिनिधी । पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिकेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांसाठी शासनाने पुन्हा मुदत वाढ‍ दिली असून आता २ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.

या योजनेत टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा व इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिकेची उभारणी करायची असून यामध्ये शेडनेटगृह उभारणी प्लॉस्टिक टनेल, पॉवर नॅपसॅक स्प्रेअर व प्लॉस्टिक क्रेटस इत्यादी घटकांतर्गत मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 50 टक्के प्रमाणे 2 लाख 30 हजार रुपये अनुदान देय राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छूक असलेल्या शेतक-यांना अर्ज करणेसाठी दिनांक 2 नोव्हेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्‍यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावयाचे आहे.

विहिती कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे. अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवडीच्या प्राधान्यक्रमानुसार तालुकास्तरावर सोडत पध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.


Protected Content

Play sound