रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निरूळ येथील ग्रामसेवक आपल्या मनमानी कारभारामुळे गावातील अतिक्रमण कायम करणे आणि नळ कनेक्शन देण्यासाठी पैश्यांची मागणी करत असल्याची तक्रार रिपाईने गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे केली आहे.
अधिक माहिती अशी की, गाव पातळीवर भ्रष्ट्राचार कसा बोकाळला आहे. याचा प्रात्यक्षीक रावेर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्या समोर बघायला मिळाला. निरुळ येथील ग्रामसेवक धनराज सुरसे हे गावात आर्थिक देवाण घेवाण करून इतरांचे अतिक्रमन कायम करतात परंतु आर्थिक दृष्टया मागास असलेले महिलांची अतिक्रमन कायम करत नाही तसेच गावात नळ कनेक्शन देण्यासाठी ग्रामसेवक एक हजार रुपयाची मागणी करत असल्याचा आरोप महिलांनी केला.
बिडीओकडे तक्रार
यावेळी रिपाई तालुकाध्यक्ष तायडे ग्रामसेवक पैसे काम करण्याचे पैसे मागतो असा आरोप करून ग्रामसेवकाची झपाई करत असतांना पंचायत समितीच्या आवारात बाहेरुन आलेले लोक बिडिओ चेंबरला जमा होऊन झपाई ऐकत होते.हे सर्व प्रकरण गट विकास अधिकारी यांच्या समोर झाले परंतु बिडिओ फक्त बघत राहिल्या.
बिडीओंचे आश्वासन
निरुळ येथील ‘ड’च्या यादीची तसेच नळ कनक्शेन सोबत दलित वस्तीच्या कामांची चौकशी केली जाईल तसेच गावातील अतिक्रम धारकांचा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या सूचना बिडिओ दिपाली कोतवाल यांनी दिल्या आहे. यावेळी रिपाई जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गाढे सतीष निकम राहुल लहासे रविंद्र सईमीरे भीमराव तायडे यांची उपस्थिती होती.तर अलका तायडे सह्याबाई खैरे अरुणा खैरे रेखाबाई खैरे बेबाबाई लहासे रेखाबाई सईमीरे या वंचित लाभार्थी देखिल उपस्थित होते.
https://www.facebook.com/watch/?v=4645098112198512