यावल प्रतिनिधी । येथील विस्तारीत वसाहतीच्या क्षेत्रातील आयशानगर या भागात आज रात्री पोलिसांनी विनापरवाना वाळुची वाहतूक करणाऱ्या एका डंपरला पोलीसांनी जप्त केले असुन, पोलीसांनी वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील आयशानगर परिसरात वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ४८६१) या चारचाकी वाहन टाटा डंपर चालक संतोष रतीलाल कोळी (वय-३१) वर्ष रा. विदगाव हा त्याच्याकडील वाहनातून बेकायद्याशीर विनापरवाना वाळुची वाहतुक करीत असतांना रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या सोबत स.फौ. मुजफ्फर पठान, पोलीस कर्मचारी राहुल चौधरी, असलम खान दिलावर खान, सतिष भोई यांच्या पथकाने टाटा डंपरमध्ये विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना त्यास पोलीसांनी वाहतुक परवान्याबाबत विचारले असता त्याच्याकडे परवाना नसल्याचे वाहनचालकाने सांगीतले. त्यावरून यावल पोलीसांनी तात्काळ टाटा डंपर ताब्यात घेतले असून याबाबत पोलीस कर्मचारी राहुल चौधरी यांनी फिर्याद दाखल केल्याने संबधीत डंपरचालक संतोष रतीलाल कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, प्रशासनाच्या वतीने हे वाहन तहसीलदार यावल हे या वाहनावर दंडात्मक कारवाई येणार असल्याचे वृत्त आहे. यावल शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणावर बेकायद्याशिर रित्या दिवसाढवळ्या वाळुची वाहतुक होत आहे हे पोलीसांनी कळते मग महसुलला काकडत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहे .