आठवडे बाजार परिसरातून तरुणाची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |धरणगाव शहरातील आठवडे बाजार परिसरातून एका तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना गुरुवार २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या प्रकरणी शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अनिल प्रल्हाद महाजन (वय-३०) रा. गारखेडा ता. धरणगाव हा तरुण शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. दर गुरुवारी धरणगाव आठवडे बाजार असल्याकारणामुळे अनिल महाजन हे त्यांची दुचाकी (एमएच १९ सीके ३४५८) धरणगाव शहरातील आठवडे बाजार येथील श्रद्धा इलेक्ट्रिक दुकानासमोर आले. त्या ठिकाणी सकाळी ९ वाजता त्यांनी दुचाकी पार्क केली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी दुकानासमोरून चोरून नेली. दरम्यान दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र दुचाकी संदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content