आता सत्य समोर येणार- ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

मुंबई प्रतिनिधी । जलयुक्त शिवार रामाच्या चौकशीतून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होणार असून सत्य समोर येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. आज राज्य मंत्रिमंडळाने जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा दिलेल्या निर्देशानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले. या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार समोर येणार असल्याचा दावा ना. गुलाबराव पाटील यांनी केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची जलाची पातळी वाढण्यात आलेली नसून याचे काम वाटप करण्यात आला. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्याचा दावा केला. या योजनेवर मोठा खर्च करण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा जराही उपयोग झालेला नाही. त्याच्या माध्यमातून याची चौकशी झाल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असून यातील सत्य समोर येणार असल्याचा दावा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केला.

Protected Content