एरंडोल, प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुख पदी अँड. किशोर काळकर यांची निवड झाली. त्याबद्दल एरंडोल भाजपातर्फे त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला.
उत्तर महाराष्ट्र भाजपाचे संघटन मंत्री अँड. किशोर काळकर यांची महाराष्ट्राच्या जनजातीय क्षेत्र राज्य संपर्कप्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर प्रथम ते एरंडोल येथे आले असता एरंडोल येथील हायवे चौफुलीवर त्यांचा तालुका भाजपातर्फे जंगी सत्कार व स्वागत करण्यात आले. यापूर्वीही त्यांनी भाजपासाठी उत्तर महाराष्ट्रात मजबूत असे संघटन तयार केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत भाजपाने त्यांची निवड जाहीर करताच तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी स्वागत समारंभ झाला.
याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन , ओबीसी जिल्हा सेलचे अध्यक्ष अशोक चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल जाधव, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, माजी तालुकाप्रमुख एस.आर. पाटील ,नगरसेवक जहिरोद्दीन शेख, नगरसेवक नितीन महाजन ,माजी नगरसेवक नरेंद्र पाटील ,तालुका युवा भाजपा मोर्चाचे अध्यक्ष निलेश परदेशी, शहर अध्यक्ष प्रशांत महाजन सुभाष पाटील,संजय साळी, सचिन विसपुते ,सचीन पानपाटील सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे ,शांताराम चौधरी, सुरेश दाभाडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.