जळगाव प्रतिनिधी । विना परवाना व बेकायदेशी गावठी पिस्तूलासह तीन जिवंत काडतूस आणि धारदार शास्त्रासह संशयित आरोपीला बळीराम पेठेतून शनिवारी अटक केली होती. त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी या संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बळीराम पेठ भागात राहणारा संशयित आरोपी विलास मुधकर लोट (वय-४०) यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहम यांना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी शनिवारी सायंकाळी बळीराम पेठेतील संशयित आरोपी विलास लोट याच्या घराची झाडाझडती घेतली असता ५ हजार रूपये किंमतीचे गावठी पिस्तूल, १ हजार ५०० रूपये किंमतीचे जिवंत काडतूस, ५०० रूपये किंमतीचा कोयता, आणि प्रत्येकी १ हजार रूपये किंमतीचे दोन गुप्त्या असा साठा आढळून आला. बेकायदेशीर व विनापरवाना शास्त्र बाळगल्याप्रकरणी संशयित आरोपी विलास लोट याला अटक करून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रविवारी या संशयीत आरोपीला ऑनलाईन न्यायालयात हजर केले असता. त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.