पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आढळला अनोळखी मृतदेह

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. घटनेच्या संदर्भात पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत पाचोरा पोलिसांकडुन प्राप्त माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानका जवळ चाळीसगावकडे जाणाऱ्या रेल्वे लाईन खंबा कि. मी. क्रं. ३६६ / ३ जवळ डाऊन लाईनवर एका इसमाचा मृतदेह गॅंगमन चेतन पाटील यांना आढळुन आला. घटनेबाबत चेतन पाटील यांनी तात्काळ उपस्टेशन प्रबंधक अंकीत प्रेमलाल साहु यांना भ्रमणध्वनीद्वारे कळविले. अंकीत साहु यांच्या खबरीवरुन पाचोरा पोलिसात अनोळखी इसमा संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करत आहे.

 

Protected Content