काव्यरत्नावली चौकात शहरातील सर्वात मोठे घरगुती गणपती मूर्ती संकलन केंद्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील काव्यरत्नावली चौकात अनंत चतुर्दशी निमित्त शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते सायं. ७ वाजेदरम्यान युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.

मागील २ वर्षांपासून सदर गणपती मूर्ती संकलन केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी जळगाव शहर महानगरपालिका व जळगाव जिल्हा पोलीस दल व सार्वजनिक गणेश महामंडळ यांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबविण्यात येत असतो. मेहरूण तलावावर विसर्जनाची होत असलेली गर्दी बघता या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. घरगुती श्रींच्या मुर्त्या सकलीत करून विधीवतरित्या मेहरूण तलाव येथे युवाशक्ती फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांतर्फे विसर्जित करण्यात येणार आहेत. २०२२ मध्ये ३४५१ तसेच २०२१ मध्ये २८७१ मुर्त्यां काव्यरत्नावली चौकात संकलित झाल्या होत्या.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणात काव्यरत्नावली चौकातील संकलन केंद्रावर आपली घरगुती श्रींची मुर्ती विसर्जनासाठी संकलीत करावी. असे युवाशक्ती फाऊंडेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, मनपा आयुक्त सौ. विद्या गायकवाड आदि. अधिकारी आपल्या घरगुती गणपती मुर्तींचे संकलन या केंद्रावर करणार असल्याचे युवाशक्ती फाऊंडेशन कार्याध्यक्ष पियुष हसवाल यांनी सांगितले.

Protected Content