औरंगाबाद वृत्तसंस्था । एका ९० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या ९० वर्षाच्या कोरोनाबाधित आजीने कोरोनावर मात केली आहे.
औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडले. शनिवारी 8 ऑगस्टला हा सर्व प्रकार समोर आला होता. तब्बल 18 दिवसानंतर या आजींनी कोरोनावर मात केली आहे.
आजी कोरोनामुक्त झाल्यानंतरही तिचे कोणीही नातेवाईक तिला घरी नेण्यासाठी किंवा बघण्यासाठी आले नाही. त्यामुळे या निराधार आजीला पोलिसांनी चिखलठाना जवळील वृद्धाश्रमात दाखल केले आहे. औरंगाबादच्या मदर तेरेसा वृद्धाश्रमात त्या आजींची सुश्रुषा केली जाणार आहे.