सावदा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) । दुध घेण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वाराला समोरून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सावदा गावाजवळी कब्रस्थान येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विजय पंढरीनाथ चौधरी (वय-६८) रा. वाघोदा खुर्द ता. रावेर हे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सावदा येथे दुध घेण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडी २३४७) ने जात असतांना सावदा गावाजवळील बोहरा कब्रस्थानजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

यात विजय चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीन परिसरातील नागरिकांनी खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी दिली. मयताचे जावाई अतूल देशमुख रा. जळगाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सावदा पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content