रावेर प्रतिनिधी । पिक विम्या संदर्भात शासनाने दोन महिन्यांपुर्वी काढलेल्या निकष चुकीचे असून शेतकऱ्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घ्यावा. मात्र याकडे कृषीमंत्र्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी लाईव्ह ट्रेडस न्यूजशी बोलतांना दिली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम स्वरूपी राहणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले होते. मात्र उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे शासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांनी यासंदर्भात पाठपुरावा करावा. देशात केळीच्या बागा उत्तर महाराष्ट्रात अधिक आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मक्याचे पिक अजूनही घरात पडून आहे. सरकारने मका खरेदीसाठी मुदत देवूनही शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जात नाही. कोरोनाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडे राज्य सरकार गांभीर्याने बघत नाही. कोरोनाचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. यापुर्वी खरेदी केलेल्या मकाचा पैसा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले नाही.
भाजपाचे सरकार असतांना ही परिस्थिती नव्हती, रासायनिक खातांचा पुरवठा अधिक प्रमाणावर होते. मात्र आघाडी सरकारच्या आमदारांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण कराव्यात असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी बोलतांना केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/644573746184157/