Home Cities जळगाव स्वातंत्र्य दिनानिमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने माजी सैनिकांचा सन्मान

0
42


जळगाव, प्रतिनिधी। भारताच्या  ७४ व्या स्वतंत्र दिनानिमित्ताने आज १५ ऑगस्ट रोजी मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे माजी सैनिकांना सत्कार करून गौरविण्यात आले

देशाच्या सीमेवर असलेले सैनिकांचे देशासाठी त्यांनी दिलेले योगदान व शौयाचा स्वतंत्रदिनानिमित्ताने सन्मान व्हावा या उद्देशाने मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनतर्फे माजी सैनिक नाईक सी.डी.पाटील व डी.एम.बडगुजर यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष फिरोज शेख यांचा हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चेतन निंबोळकर,श्री.मेढे, जिनल जैन, उपस्थित होते.


Protected Content

Play sound