मुलाला कोरोनाची लागण ; भीतीपोटी बापाची गळफास घेऊन आत्महत्या

पंढरपूर (वृत्तसंस्था) मुलाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीपोटी वृद्ध पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोला तालुक्यातील बामणी( शेळकेवाडी) येथे घडली आहे. आनंदा धोंडिबा कोळेकर (वय-७०) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

 

बामणी (शेळकेवाडी) येथील वामन आनंद कोळेकर याची ११ ऑगस्ट रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याला कमलापूर येथील कोव्हिड सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तर वामन कोळेकर यांच्या घरातील सर्व सदस्यांची आरोग्य विभागाकडून कोरोना टेस्ट केली जाणार होती. आपली सुद्धा टेस्ट पॉझिटिव्ह येईल, या भीतीपोटी वडील आनंदा कोळेकर यांनी शुक्रवारी पहाटे घराशेजारील जनावरांच्या पत्राशेडमधील लोखंडी अॅंगलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. बेशुद्ध अवस्थेतील आनंदा यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, याआधीही राज्यात कोरोनाच्या भीतीमुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

Protected Content