कर्तव्य तत्पर तहसीलदारांचा काँग्रेस समितीतर्फे सत्कार

 

यावल प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीत अतिशय तत्परतेने कर्तव्य बजावणारे येथील तहसीलदार जितेंद्र कुवर यांचा काँग्रेस समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोरोना संक्रमणाच्या कार्यकाळात तहसील कार्यालयात यावल येथे तालुक्याचे कर्तव्यनिष्ठ तहसीलदार जितेंद्र कुवर यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करून त्यांना भावी वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे, काँग्रेससेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, शहराध्यक्ष कदिर खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जहाँगिर एस. तडवी, उपअभियंता निंबाळकर, ग्रामीण रुग्णालयाचे यावलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अनिल जंजाळे, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे शहराध्यक्ष नईम भाई, निवासी नायब तहसीलदार आर. डी. पाटील, यावलचे मंडळ अधिकारी शेखर तडवी यांच्यासह इतर पदाधिकारी अधिकारी महसुलचे कर्मचारी आणि कार्यकर्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content