Home धर्म-समाज गणेशोत्सवासाठी कोकणात उद्यापासून तब्बल १६२ रेल्वे धावणार

गणेशोत्सवासाठी कोकणात उद्यापासून तब्बल १६२ रेल्वे धावणार


मुंबई (वृत्तसंस्था) भारतीय रेल्वे विभागाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यानुसार १५ ऑगस्टला पहिली रेल्वे गाडी सुटणार आहे.

 

कोकण रेल्वेने याबाबत केलेल्या घोषणेनुसार ४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत १६२ गाड्या सुटणार आहेत. यात ८१ अप तर ८१ डाऊन गाड्यांचा समावेश असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरुन ही पहिली ट्रेन सुटणार आहे. ही ट्रेन सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. लवकरच याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर होणार आहे. या सर्व रेल्वे गाड्या आरक्षित असणार आहेत. यासाठी १५ ऑगस्टपासून तिकिट बुकिंग सुरु होणार आहे. दरम्यान, १५ ऑगस्टला निघालेली ट्रेन १६ ऑगस्टला कोकणात पोहोचणार आहे.


Protected Content

Play sound