दहिगाव, सावखेडा सिम, महेलखेडीमध्ये १० पॉझिटिव्ह

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कोरोना रॅपिड एंटीजन व आरटीपीसीआर टेस्ट साठी वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून दररोज शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. दहिगाव येथील अगोदर घेतलेल्या ३४ टेस्टचे अहवाल प्राप्त झालेले असून यात ०३ व्यक्ती पॉझिटिव्ह मिळून आले असून यात एका खाजगी डॉक्टरांचा समावेश आहे. तर सावखेडासिम येथील ०२, व महेलखेडी येथील ०५ व्यक्ती असे १० रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आलेले आहेत.

ग्रामीण भागात कोविंड 19 विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी व मृत्यू दर कमी करणे, रुग्णाला पहिल्या पायरीवर ओळखने, रुग्णाचे लवकर निदान होऊन तो वाचावा व तो लवकर अलगीकरण झाला तर इतर आजूबाजूचे १५ व्यक्ती तो संक्रमित होण्यापासून वाचवतो. या अनुषंगाने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त व्यक्तींनी स्वतःहून चाचणी करून घेण्याचे आवाहन डॉ. गौरव भोईटे यांनी केलेले आहे. यात गावातील व्यवसायिक व्यक्ती, खाजगी डॉक्टरांकडून मिळालेले संशयित रुग्ण, तसेच comorbid-प्रतिकारशक्ती कमी असलेले अशा सर्व व्यक्तींचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वॅब घेण्यात येत आहेत.

मोहराळा येथे २५ व महेलखेडी येथे २१ याप्रमाणे शिबिरात आरटीपीसीआर व रॅपिड एंटीजन टेस्ट साठी स्वॅब घेण्यात आले. यावेळी कोरपावली येथील खाजगी डॉक्टरांनीही स्वतःहून टेस्ट करून घेतल्यानंतर ग्रामस्थांचे एक प्रकारे शंका निरसन झाले.

स्वॅब वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, आरोग्य सेवक अरविंद जाधव, कल्पेश पाटील यांनी घेतले व त्यांना राजेंद्र बारी, प्रवीण सराफ, संजय तडवी, दिवाकर सुरवाडे, शिवप्रताप घारू व समीर तडवी यांनी मदत केली. शिबीर यशस्वीतेसाठी जुगरा तडवी, मोहराळा येथील आशा सेविका निर्मला पाटील, योगिता पाटील, कल्पना पाटील व महेलखेडी येथील संगीता पाटील, शहानुर तडवी, यांनी परिश्रम घेतले. महेलखेडी येथील सरपंच विलास पाटील, पोलीस पाटील मधुकर पाटील , तसेच ग्रामपंचायतचे गोपाळ अडकमोल यांनी गावात जनजागृती करून शिबिरात सहकार्य केले.

Protected Content