खडकदेवळा येथे अनाधिकृत चारीचे काम तात्काळ थांबवा; ग्रामस्थांची तक्रार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील राज्य महामार्गावर सुरू असलेले या अनाधिकृत चारीचे काम तात्काळ थांबविण्यात येवुन सदर सुरू असलेले चारीच्या कामामुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास व चारीमुळे अपघातास आमंत्रण देण्याचा प्रकार थांबवावा. अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

१२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु येथील तारखेडा ते पिंपळगांव राज्य महामार्ग क्रं. १७ यावर रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीची संमती नसतांना कोणताही ठराव नसतांना सदस्यांना न विचारता गावातील अनिल विश्राम पाटील यांनी जेसीबी मशीन लावुन रस्त्याच्या उत्तर दिशेच्या रस्त्यावर पुर्व पश्चिम राज्य महामार्ग क्रं. ४८ पासुन परत येवुन सुरेश काशिनाथ सिनकर यांचे घरापर्यंत चारी कोरून सार्वजनिक वापराचा रस्ता बंद केला. व त्यामुळे नागरीकांना वापरण्यास तसेच रस्त्याने वाहन चालविण्यास अडथळा निर्माण केला आहे.

त्यामुळे सार्वजनिक रहदारी व वापरास त्रास होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असुन पाणी साचुन आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे, अनिल पाटील यांनी विनाकारण कोणाचीही मागणी नसतांना ग्रामपंचायतीची परवानगी नसतांना देखील स्वतःच बेकायदेशिर कृत्य केले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांची देखील परवानगी घेतलेली नाही, व ग्रामस्थांना त्रास होईल असे कृत्य केले.

याकामी दुपारी ३ वाजता त्यास विचारणा केली व त्यानंतर १३ आॅगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील, व ग्रा. पं. सर्व सदस्यांना बोलावुन पहाणी केली असता अनिल पाटील, त्यांचा मुलगा व त्यांचे भाऊ हे येवून शिवीगाळ करू लागले व दम देवु लागले, वास्तवीक अनिल पाटील हे ग्रामपंचायतीत अपात्र झालेले सदस्य आहे. ते आज रोजी सरपंच देखील नाहीत. असे असतांना ग्रा. पं. च्या नावाने बेकायदेशिर कृती करून सार्वजनिक शांततेस अडथळा निर्माण करून शांतता भंग करीत आहे. त्यामुळे वाद हाण्याची शक्यता आहे. व त्यांच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक वाहतुकिस अडथळा होवुन अपघात होण्याची शक्यता आहे. व ग्रामस्थांचा रस्त्यावर येण्या जाण्यासाठीचा रस्ता बंद झालेला आहे.

म्हणुन निलेश खराटे यांनी अनिल पाटील यांचे विरूध्द तक्रारी अर्ज दिला आहे. अनिल पाटील यांचे विरूध्द व त्यांचा मुले व भाऊ यांचे विरूध् कायदेशिर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचा तक्रारी अर्ज निलेश अरुण खराटे रा. खडकदेवळा ता. पाचोरा यांनी संबंधित प्रशासनास दिला आहे. तसेच अर्जाच्या प्रति जिल्हाधिकारी (जळगांव), सार्वजनिक बांधकाम उपविभाग (पाचोरा), तहसिलदार (पाचोरा), पोलिस निरीक्षक (पाचोरा), ग्रामसेवक (खडकदेवळा), कनिष्ठ सहाय्यक आरोग्य विभाग (पाचोरा) यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Protected Content