मुंबई (वृत्तसंस्था) फक्त सुशांतची संपत्ती आणि पैसा हडपण्यासाठी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य संपर्कात आले होते. तसेच रियाने त्याला औषधांचा ओव्हरडोज दिल्याचा खळबळजनक आरोप बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात केला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. यामध्ये रियावर अनेक गंभीर आरोप केले गेले आहेत. रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य सुशांतच्या संपर्कात फक्त त्याचा पैसा हडपण्यासाठी आले होते. सुशांतला मानसिक आजार नव्हता. रियाने त्याच्या आजाराचे खोटे चित्र निर्माण केले होते. त्याला औषधांचा ओव्हरडोज दिला. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचा या प्रकरणाच्या चौकशीत पाठिंबा मिळाला नाही, असेही म्हटले गेले आहे. दरम्यान,१४ जून रोजी सुशांत सिंहने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुमारे एक महिन्यानंतर सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.