डी-मार्ट जवळून तरूणीची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डी-मार्ट परिसरातून तरूणीच ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी गुरूवार ५ मे रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हर्षदा अंकुश निकम (वय-२०) रा. हनुमान मंदिरासमोर, रामेश्वर कॉलनी जळगाव हे कामाच्या निमित्ताने त्यांची दुचाकी (एमएच १९ डीइ ४५६४) रोजी सायंकाळी ५.३० वाजता डी मार्ट जवळील ब्युटी पार्लरच्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. काम आटपून सायंकाळी ७ वाजता दुचाकीजवळ आल्या असता असता त्यांना दुचाकी जागेवर आढळून आले नाही. त्यांनी दुचाकीचा शोध घेतला परंतु कुठेही दुचाकी मिळून आली नाही. गुरूवार ५ मे रोजी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!