जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना कळविण्यात येते की, सैनिकी मुलींचे वसतिगृहामध्ये कंत्राटी चौकीदार पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदरचे पद हे 24 तास कामकाजाचे असून प्रतिमहा मानधन रूपये 8911 इतके आहे.
या पदासाठी इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे दिनांक 10 ऑगस्ट, 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0257-2241414 वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.