मद्यधुंद बस चालक पोलीसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी । मद्य प्राशन करून बेदरकारपणे बस चालवणार्‍या चालकाला प्रवाशांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी घडली.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव डेपोची राळेगाव-जळगाव ही बस मंगळवारी रात्री मुक्कामाला जळगाव आगाराला होती. सकाळी साडेसात वाजता एमएच ४० ही बस पुन्हा राळेगावकडे जाणार होती. यानुसार बुधवारी सकाळी चालक विठ्ठल लक्ष्मण वुईके (वय ४०, रा. राळेगाव) याने आगारातून बस काढली. आगारात येण्यापूर्वी चालकासह वाहक अंचल हरीभाऊ दांडेकर (वय ३४, हिंगणघाट, जिल्हा वर्धा) या दोघांनी मद्यप्राशन केले होते. प्रवाशी बसवून बस काढण्यापूर्वी कंट्रोलरकडे कोणतीही नोंदणी न करता थेट बस बाहेर काढली. आगारातून बस काढून ती चालवताना मद्यावस्थेमुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटत असल्याचे प्रवाशांना जाणवले. बेशिस्तीत बस चालवत असल्याने रस्त्याच्या बाजुच्या अन्य वाहनधारकांकडूनही ओरड वाढली होती. वाहकानेही मद्यप्राशन केले असल्याने त्याचे बोलणेही प्रवाशांना खटकले. यामुळे बसमधील प्रवाशांनी आगार व्यवस्थापनाला देण्यात आली. यामुळे काही कर्मचारीही घटनास्थळी पोहचले. बसमधील प्रवाशांनी या चालकांविषयी तक्रार केली. यानुसार दोघांविरुद्ध मद्य प्राशन करून बस चालवल्याप्रकरणी स्थानकप्रमुख नीलिमा बागूल यांच्या फिर्यादीवरून औद्योजिक वसाहत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content