नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये देशात ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद झाली. ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्ण करोनामुक्त झाले. तर ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या १०,३८,७१६ वर पोहोचली असून मृतांचा आकडा २६,२७३ वर पोहोचला आहे. देशात सद्य घडीला ३,५८,६९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यासोबतच आतापर्यंत एकूण ६,५३,७५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाख ९२ हजार ५८९ इतकी झाली आहे. राज्यातील १ लाख ६० हजार ३५७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू, नवी दिल्ली, गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. दरम्यान, देशात दहा लाखांमागे ७२७ करोना रुग्ण असून जगाच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण ४ ते ८ पटीने कमी आहे. एकूण ३ लाख ४२ हजार ७५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.