शेंदूर्णी, प्रतिनिधी, प्रतिनिधी । शेंदूर्णी नगरपंचायत कार्यालयात आज सर्व लोकप्रतिनिधी,नागरिक व व्यापारी यांची जनता कर्फ्यूबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत दि. १३ ते १९ जुलै असा ७ दिवसीय जनता कर्फ्यु पाळण्याचे एकमुखाने ठरविण्यात आले. .
शेंदुर्णी येथील एका व्यक्तीचे पाचोरा येथील कोविड १९ रुग्णालयात ४ दिवसापूर्वी उपचारा दरम्यान मृत्यू झाला त्याचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्याचा कोरोना संसर्ग अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मृताच्या निकटच्या संपर्कातील २८ लोकांचे स्वॅब घेऊन पहुर येथिल क्वारंटाईन सेंटरमध्ये अलगीकरण करण्यात आले होते. काल प्राप्त अहवालानुसार २८ पैकी त्यातील १९ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेंदूर्णी येथिल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीला नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, माजी उपसरपंच गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तजय अग्रवाल, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शेख अकिल व्यापारी व नागरिक उपस्थित होते. जनता कर्फ्यु दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० या वेळी कृषी केंद्र खुले राहतील तर दररोज सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ६ ते ८ दूध केंद्र खुले राहतील. मेेडिकल रोज सकाळी ९ तेे ७ तर उर्वरीत सर्व व्यवसाय ,व्यापारी प्रतिष्ठान ,फळ भाजीपाला, मटण दुकानेे, पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे सर्व राजकीय पक्षाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे.