यावल येथे होमगार्ड दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन (व्हिडीओ)

यावल – अय्युब पटेल  |  येथील होमगार्डस् कार्यालयाच्या वतीने येथे होमगार्ड व नागरी संरक्षण दिन साप्ताहिक पथसंचलन करून उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

 

जळगाव जिल्हा समादेशक, अप्पर पोलीस अधीक्षक होमगार्डस् जळगाव यांच्या आदेशानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर रोजी  ७६ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधुन होमगार्ड पथकाच्या वतीने यावल पोलीस कवायत मैदान येथे व परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या  साप्ताहिक पथसंचलन करण्यात आले. आज रविवार दि. ११ डिसेंबर रोजी वर्धापन दिनानिमीत्त पोलीस ग्राऊन्डपासुन होमगार्ड चा गावात बुरुज चौक – खिरनीपुरा – महाजन गल्लीतुन मेनरोड- बारी चौक ते पोलीस ग्रॉऊन्ड पर्यंत  पथसंचलन करण्यात आले.  तसेच होमगार्ड वर्धापन दिनानिमीत्त सर्व पुरुष व  होमगार्ड यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या त्यांचे कर्तव्य जबाबदारीचे योगदान यांची जाणीव त्या बाबत माहिती देण्यात आली.  याप्रसंगी प्र समादेशक भानुदास कवडीवाले, रमेश चौधरी, पंकज फीरके , विजय जावरे, पलटन नायक असे  ५७  होमगार्ड यांनी या पथसंचालन तसेच  विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी होमगार्ड भगवान पाटील,  नथ्थु महाजन,  कैलास लावणे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त  केले. होमगार्ड व संरक्षण वर्धापन दिनानिमित्ताचे आयोजीत सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी  समदेशक भानुदास कवडीवाले व पलटन नायक विजय जावरे व त्यांचे सर्व होमगार्ड सहकारी यांनी कामकाज पाहिले.

Protected Content