दिपस्तंभ व काँग्रेस ग्रामीण सेवा फाउंडेशन यांच्यातर्फे अनाथ मुलांना शैक्षणिक मदत

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणुसंसर्गाच्या संकट काळात कोरोना बाधीत होवुन ज्यांचे पालक मृत्युमुखी पडले असतील अशा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातल्या मुलांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फाउंडेशन आणि दीपस्तंभ युथ फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पुरविले जाणार आहे. 

तरी जळगाव जिल्ह्यातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा आणि संपुर्ण जळगाव जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, महिला, युवक कार्यकर्ते, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य तसेच सर्वच सामाजीक व विधायक क्षेत्रातील मान्यवर यांनी आपापल्या तालुक्यातील तथा परिसरातील गावातील, शहरातील पात्र मुलांची माहिती नाव पत्ता आम्हाला खालील संपर्कासाठी असलेल्या मोबा. क्रमांकावर माहीती कळवावी व गरजूंना मिळणारी मदत त्यांच्या पर्यंत पोहचणे कामी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस ग्रामीण सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेस सेवा फौंडेशन कोविड 19 कंट्रोल रुमचे जिल्हाप्रमुख जलील सत्तार पटेल यांनी कळविले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील नोंदणी साठी संपर्क जलील पटेल राहणार कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव , मोबा .क्रमांक. ९०४९०६८५५५, ९२०६६६२४२४ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावे,

टीप सदर कोविड १९ च्या काळात ज्या मुलांच्या आई वडिलांचे निधन झालेले आहे. त्यांना संपूर्ण शैक्षणिक मदत मिळेल आणि याची नोंदणी निःशुल्क आहे. तसेच या सामाजीक व विधायक कार्यासाठी कुणाकडून ही या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतली जाणार नसुन ती जर शैक्षणीक साहीत्य वस्तू स्वरूपात असेल तरच स्विकार केला जाईल.

उदारणार्थ वह्या,पेन, पेन्सिल पुस्तक, कंपास, रबर नोटबुक किंवा इतर शैक्षणिक साहित्य कार्यक्रमाच्या माध्यमातुन दिले जाणार आहे. अशी माहीती ग्रामीण कॉग्रेस सेवा फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी दिली आहे .

 

Protected Content