


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल येथील शहरातील सामाजिक कार्यकर्त नितिन सोनार लवकर शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याची माहिती मिळालेली आहे. मुक्ताईनगर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पुर्णत्वास गेलेल्या विकास कामांचे लोकार्पण व भुमीपुजनाचे भव्य कार्यक्रम होणार आहे. यावेळी पक्षातील विविध मान्यवरांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
यावल शहरातील स्वर्णकार समाजातून येणारे सामाजिक कार्यकर्ते नितिन सोनार यांचा समाजहिताच्या उपक्रमामध्ये कायम मोठा सहभाग आहे व त्यांनी केलेल्या समाज कार्यातून त्यांनी शहरात व परिसरात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे, दरम्यान आपल्या या कार्याला कुणाची तरी साथ मिळावी या दृष्टीकोणातुन त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.या पक्ष प्रवेशातुन सोनार यांना संघटन बांधणीसाठीची मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.



