Home क्राईम हिटरचा शॉक लागून जळगावात एकाचा मृत्यू !

हिटरचा शॉक लागून जळगावात एकाचा मृत्यू !

161097 shock
161097 shock


जळगाव (प्रतिनिधी) आंघोळ करत असताना हिटरचा शॉक लागून एका प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी शहरातील शिव कॉलनीत घडली. अरविंद नीळकंठ पाटील ( 55) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

 

अरविंद नीळकंठ पाटील हे कुटूंबासह शिव कॉलनीत राहत होते. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास उठल्यावर नेहमी प्रमाणे ते आंघोळ करण्यासाठी गेले. यावेळी अचानक त्यांचा हिटरला धक्का लागताच त्यांना शॉक लागला. आवाज ऐकून कुटूंबातील सदस्यांनी बाथरूमकडे धाव घेत अरविंद पाटील यांना बाहेर काढले. त्यांचा मुलगा राजेंद्र पाटील यांनी त्यांना वाहनातून तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, याप्रकरणी डाँ. भोळे यांनी दिलेल्या खबरीवरून रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound